निम्न तेरणा धरणातून विसर्ग वाढवला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
निम्न तेरणा प्रकल्प माकणी येथील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणारा वाढता येवा लक्षात घेता, पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी आज, दि. २८/०८/२०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता धरणाचे एकूण ४ द्वारे उघडण्यात आली आहेत. सध्या १० वक्रद्वारांद्वारे १० सेंटिमीटरने पाण्याचा विसर्ग सुरू असून, तेरणा नदीपात्रात एकूण ३,८१६ क्यूसेक्स (१०८.०७ क्यूमेक्स) इतका विसर्ग होत आहे.
धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार विसर्ग वाढवणे किंवा कमी करणे याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. तरी, नदीकाठावरील आणि पुरामुळे बाधित होऊ शकणाऱ्या गावातील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन लातूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.
-पुरनियंत्रण कक्ष, निम्न तेरणा प्रकल्प माकणी