ग्रामविकासासाठी खासगी कंपन्यांनी पुढे यावे – मुख्यमंत्री फडणवीस

      मुंबई दि. २१ : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या पाचव्या संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉर्पोरेट कंपन्यांनी फक्त शहरी नव्हे तर दुर्गम व मागास जिल्ह्यांतही सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले.

बैठकीत एसटीएल लिमिटेडच्या जलसंधारण अहवालाचे प्रकाशन व लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील रावसाहेब पाटील शेतकरी उत्पादक कंपनीच्या २ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या अत्याधुनिक गोदामाचे ई-लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पासाठी १ कोटी २२ लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, व्हीएसटीएफच्या पहिल्या टप्प्यात सकारात्मक परिणाम दिसून आले असून दुसरा टप्पा अधिक प्रभावीपणे राबविण्यात येईल. गावात कायमस्वरूपी संस्थात्मक संरचना उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी टाटा ग्रुपचे अध्यक्ष नोवेल टाटा, जिंदाल समूहाच्या संगीता जिंदाल, आयडीबीआयचे राकेश शर्मा यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. टाटा, जिंदाल व आयडीबीआयसारख्या कंपन्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये ग्रामविकास, आरोग्य व सामाजिक उपक्रमासाठी सहकार्याची हमी दिली.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर