लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

      लातूर, दि. १३ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त लातूरमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून गरजू रुग्णांना नेत्र तपासणीसह आवश्यक सल्ला व उपचार सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

हे शिबिर डॉ. काळगे लक्ष्मी नेत्रालय यांच्या वतीने आयोजित करण्यात आले असून, खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि डॉ. रमेश राठोड यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. ह. शिवाजी काळगे व डॉ. सविता काळगे यांनी केले आहे.

       शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना समोर, जिल्हा परिषद शेडजवळ, लातूर दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी वेळ दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत तपासणी करून घ्यावी. 

      या शिबिरात नेत्र तपासणी, चष्मा क्रमांक तपासणी, डोळ्यांच्या आजारांवरील सल्ला तसेच मोफत उपचार सुविधा उपलब्ध असतील. आयोजकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर