लातूर - मुंबई वंदेभारत रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार

लातूर : शैक्षणिक, औद्योगिक, आरोग्यसेवा, आणि कृषी उत्पादन व्यापाराचे केंद्र म्हणून नावारूपाला आलेले लातूर शहर, वंदेभारत रेल्वे सेवेने मुंबई या आर्थिक राजधानीशी जोडले जावे, त्याचबरोबर लातूर येथून उड्डाण योजनेअंतर्गत विमानसेवा सुरू करावी या लातूरकरांच्या मागन्या सातत्याने आपण अनेक पातळ्यांवर  लावून धरल्या आहेत. लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनीही केंद्र शासनान, रेल्वे मंत्रालय, नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि लोकसभेत या मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा केला, त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून लवकरच वंदे भारत रेल्वे सेवा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्याचबरोबर विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने लातूरचे विमानतळ एमआयडीसी कडून एमएडीसी कडे हस्तांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि लातूरकरांच्या वतीने आभार.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी, लातूर शहर रेल्वे ट्रॅकवर आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते. मुख्यमंत्री असताना त्यांनी लातूर- कुर्डूवाडी दरम्यानचा रेल्वे मार्ग बांधण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ५०% खर्चाची तरतूद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, मंत्री असतानाच त्यांनी लातूरचे विमानतळही रोजगार हमी योजनेतून बांधले होते. त्यांच्या या निर्णयांचा  पुढे राज्यातील अनेक रेल्वे प्रकल्प, आणि विमानतळ  बांधण्यासाठी उपयोग झाला आहे.

लातूर शहर रेल्वे ट्रॅकवर आल्यानंतर येथून अनेक रेल्वे सेवा सुरू झाल्या असून लातूरच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे. लातूर लोकसभा मतदारसंघातून डॉ शिवाजी काळगे निवडून गेल्यापासून त्यांनी या मतदारसंघातील प्रकल्पांचा पाठपुरावा केंद्र शासनाकडे सुरू केला आहे, लातूरला वंदे भारत रेल्वे सेवा सुरू करावी, लातूर-पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करावी, लातूर येथून उत्तरेत दिल्लीकडे जाणारी रेल्वे सेवा सुरू करावी, लातूर-नांदेड , लातूर-गुलबर्गा दरम्यान रेल्वे मार्ग बांधण्यात यावेत लातूर येथून उड्डाण योजनेतुन विमानसेवा सुरू करावी, रेल्वे बोगी कारखान्यातून उत्पादन सुरू करावे , येथे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, लातूरला आकाशवाणी केंद्र सुरू करावे, आदी मागण्या त्यानी लावून धरल्या आहेत. 

खासदार मा. डॉ. शिवाजी काळगे  त्यांच्या पाठपुराव्यातून केंद्र पातळीवरील लातूरचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून, लातूर-मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे संकेत मिळाल्याने लातूरच्या प्रवाशांची सोय होणार आहे  शिवाय या जिल्ह्यातील औद्योगिकीकरणाला आणि व्यापारालाही चालना मिळेल हा विश्वास आहे. पुनश्च एकदा त्यांचे अभिनंदन.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर