सुरत येथे “मधुमेहावर मात व सहज वजन कमी”: डॉ. दीक्षित सरांचे व्याख्यान
सुरत, दि. २३: SVNIT अल्युम्नी असोसिएशन सुरत चॅप्टरतर्फे “Reversal of Diabetes & Effortless Weight Loss” या विषयावर रविवारी, दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. “World free of obesity and diabetes” या मोहिमेअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केले आहे .
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ ते ९.३० या वेळेत सहभोजन व स्नेहमेळाव्याने होणार आहे. त्यानंतर ९.३० ते ११ वाजेपर्यंत मुख्य व्याख्यानाचे सत्र घेण्यात येईल. हा उपक्रम SVNIT कॅम्पस येथील कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील COED 402 सेमिनार हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मुख्य वक्ते म्हणून डॉ. जे. व्ही. दीक्षित सर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. मधुमेह जागृतीसाठी दीर्घकाळ मोहिम राबविल्याबद्दल त्यांचे नाव जागतिक विक्रमात नोंदले गेले आहे. आपल्या भाषणात त्यांनी मधुमेह मुक्त होण्याचा (Reversal of Diabetes) आणि सहज वजन कमी करण्याचे उपाय स्पष्ट करणार आहेत. आरोग्यपूर्ण जीवनासाठी आहारशैली, व्यायाम व जीवनशैलीतील बदलांची गरज अधोरेखित केली.
या कार्यक्रमास SVNIT चे विद्यार्थी, प्राध्यापक, माजी विद्यार्थी तसेच आरोग्याबद्दल जागरूक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. शंका निरसन सत्राद्वारे डॉ. दीक्षित यांनी प्रत्येकाला निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले.संपर्कासाठी हेल्पलाईन क्रमांक : +91 87583 66507 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.