रास्त भाव दुकानदारांकडून नियमांची अंमलबजावणीची मागणी – तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण
लातूर, दि.12: लातूर तालुक्यातील रास्त भाव दुकानदारांनी भावफलक लावावेत व दुकाने उघडण्याची वेळ दर्शनी भागात नमूद करावी, तसेच संबंधित नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
या उपोषणात रास्त भाव दुकानदार, स्थानिक नागरिक व विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी नागरिकावर होणाऱ्या अन्यायाविषयी चर्चा करण्यात आली. उपोषणादरम्यान प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. परंतु यावेळी नायब तहसीलदार पुरवठा अधिकारी श्री. अंबर साहेब यांनी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
उपोषण स्थळी नेत्यांनी रास्त भाव दुकानदारांच्या समस्या मांडत, भावफलक न लावणाऱ्या व वेळेचे पालन न करणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली. उपोषणकर्ते जोंधळेसह, साधुभाऊ गायकवाड, पत्रकार बाळ होळीकर, हतीमभाई शेख, उपस्थित होते.