मधुमेह तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
नाशिक, दि. डॉ. जगन्नाथ दीक्षित संचलित अडोर ट्रस्ट यांच्या वतीने नाशिकमध्ये एचबीए1सी (मधुमेह) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना परवडणाऱ्या दरात, फक्त १५० रुपयांत ही तपासणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शिबिराचे आयोजन दर महिन्याच्या १०, ११ आणि १२ तारखेला सायंकाळी ४.३० ते ६.०० या वेळेत करण्यात येणार आहे. (जर ९ तारीख रविवार असेल तर शिबिर १ दिवस पुढे होईल.) तसेच दर महिन्याच्या २४ व २५ तारखेला सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत एचबीए1सी व फास्टिंग इन्सुलिन या तपासण्या फक्त ४५० रुपयांत केल्या जाणार आहेत.
शिबिर मधुमेह मुक्ती समुपदेशन केंद्र, पाचवा मजला, गजानन अनेक्स, पाटील लेन १, मॅम्स हॉस्पिटलच्या बाजूला, कॉलेज रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. तसेच दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत ऋतुरंग भवन, दत्तमंदिर बस स्टॉपच्या मागे, नाशिक रोड येथेही तपासण्या होणार आहेत.
या शिबिरात नागरिकांना मधुमेह तपासणीसोबतच योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैलीविषयक मार्गदर्शन मिळणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 9322260866 /9322014152 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आयोजकांनी आवाहन केले आहे.