दयानंद पाटील यांची पोलीस निरीक्षक वर्ग 1 पदी पदोन्नती



      लातूर: जिल्हा पोलिस मुख्यालय लातूर भरोसा सेलचे श्री. दयानंद पाटील साहेब यांची पोलीस निरीक्षक वर्ग एक पदी पदोन्नती झाली आहे. त्याबद्दल साहेबांचे मनस्वी अभिनंदन आणि पुढील कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा. 
   श्री. दयानंद पाटील साहेब हे  पोलीस दलातील एक संवेदनशील आणि सामाजिक जाणीव असणारे व्यक्तिमत्व आहेत. गेल्या अनेक वर्षापासून 
 आपल्या घरचा शिवजन्मोत्सव साजरा करण्याची प्रथा निर्माण करणारे , आणि ज्यांच्या घरच्या शिवजन्मोत्सवाची संपूर्ण महाराष्ट्राने दखल घेतली, असे एक उत्कृष्ट लेखक, साहित्यिक आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व श्री. दयानंद पाटील साहेब यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. 
     पाटील यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर