दुर्गेश बालाजी चेंटमपल्ले याने CBSE बोर्ड परीक्षेत 98% गुण घेऊन विद्यालयात द्वितीय
*पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या हस्ते दुर्गेशचा गौरव*
लातूर : संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल लातूर या शाळेचा आदर्श विद्यार्थी दुर्गेश बालाजी चेंटमपल्ले याचा लातूर जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक (DYSP) आदरणीय श्री. मंगेश चव्हाण साहेब यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. यावेळी शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील सर, उपाध्यक्ष पी.आर .देशमुख सर संस्थेचे सचिव तथा लातूर पॅटर्नचे जनक प्रा. अनिरुद्ध जाधव सर, सहसचिव तथा संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल लातूरचे अध्यक्ष आदरणीय गोपाळ शिंदे सर ,सुनील सोनवणे सर, संचालक डॉ. बी.ए. मैंदर्गे सर,विद्यालयाच्या प्राचार्या विना कोपकर मॅडम, राठोड सर, स्मिता सोळुंके मॅडम, दुर्गेशचे आजोबा अंबादास चेंटमपल्ले, आजी वत्सलाबाई चेंटमपल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. दुर्गेश बालाजी चेंटमपल्ले याने CBSE बोर्ड परीक्षा इयत्ता दहावी मध्ये 98% गुण घेऊन विद्यालयातून द्वितीय येण्याचा बहुमान मिळवला आहे.विशेष म्हणजे राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या NEET स्क्रिनिंग टेस्ट मध्येही उत्तम गुण घेऊन तो राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रवेशास पात्र ठरला आहे. दुर्गेश हा अत्यंत अभ्यासू विद्यार्थी असून त्याने पियानो वाजवण्याची कला संपादित केली आहे. विद्यालयातील कला मंचात व सांस्कृतिक कार्यक्रमात त्याने अनेक गीते वाजवली आहेत. जिद्द,चिकाटी व सूक्ष्म नियोजन करुन दुर्गेशने हे यश मिळवले आहे. बालवयापासूनच त्याला अध्यात्माची आवड आहे. या दुहेरी यशात मोलाचे मार्गदर्शन करून घडविणारे दुर्गेशचे आई वडील हे दोघेही आदर्श शिक्षक असून त्याचे काका सुशेन चेंटमपल्ले हे जि.प. अहिल्यानगर येथे पदवीधर शिक्षक आहेत.
*दुर्गेशच्या या यशाबद्दल शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.