महा-ई-सेवा केंद्रामार्फत तात्काळ प्रमाणपत्र उपलब्ध करून देणाऱ्या यंत्रेणेकडून नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवावी

*पूर्व भाग कृती समितीने तहसीलदाराकडे निवेदनाद्वारे केली मागणी*
       लातूर, दि.17:  शहरातील तहसील कार्यालयात महा-ई-सेवा केंद्र यांच्यातर्फे तात्काळ प्रमाणपत्र उपलब्ध करून देणाऱ्या यंत्रणेकडून नागरिकांची होणारी आर्थिक लूट व नागरिकांची होणारी हेळसांड थांबवण्याची लातूर शहर पूर्व भाग नागरी हक्क कृती समितीची लातूर तहसीलदार यांच्याकडे आज गुरुवार दिनांक १७ जुलै २०२५ रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. 
लातूर तहसील कार्यालयातील दिलेल्या निवेदनात  लातूर तहसील कार्यालयातून मिळणारे  विविध प्रमाणपत्र मागणी अर्ज  शहरातील महा-ई-सेवा केंद्रा मार्फत नागरिक दाखल करत असतात हे दाखल केलेले प्रमाण पत्र तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र चालक नागरिकांना तात्काळ प्रमाण पत्र पाहिजे असेल तर जास्तीच्या अधिक पैशाची मागणी करून तात्काळ प्रमाण पत्र उपलब्ध करून देतात, एकाच तारखेत दोन वेगवेगळ्या नागरिकांनी उत्पन्न प्रमाण पत्र मागणी अर्ज सादर करताना पहिल्या नागरिकांने अतिरिक्त जास्तीचे पैसे न देता शासनाकडून निर्धारित शुल्क भरले असता उत्पन्न प्रमाण पत्र मिळण्याकरिता ८ ते १० दिवस लागतात तर दुसऱ्या नागरिकांने तात्काळ प्रमाण पत्राकारिता महा ई सेवा केंद्र चालकास जास्तीचे पैसे दिले की उत्पन्न प्रमाणपत्र दोन दिवसात मिळते पण एकाच तारखेला उत्पन्न प्रमाणपत्र शासनाचा निर्धारित शुल्क भरणाऱ्या नागरिकांचे ८ ते १० दिवस प्रमाण पत्र निघत नाही, याचा अर्थ काय समजावा ? लातूर शहरातील महा-ई-सेवा केंद्र चालक व लातूर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांत आर्थिक साखळी यंत्रणेकडून नागरिकांची आर्थिक लूट होताना पाहायला दिसत आहे याची सखोल चौकशी करून नागरिकांची होणारी आर्थिक लूट व नागरिकांची होणारी हेळसांड थांबवण्याची मागणी लातूर शहर पूर्व भाग नागरी हक्क कृती समिती च्या वतीने लातूर तहसीलदार यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर अध्यक्ष दीपक गंगणे, डी. उमाकांत, सामाजिक कार्यकर्ते नितीन चालक, भगवेश्वर धनगर आदिलसह परिसरातील इतर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर