हरंगुळ बु. येथे सोमवारी विविध देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना
* गुरुवर्य व मान्यवरांच्या उपस्थिती सोहळा.
* सोहळयानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रम.
* यशस्वीतेसाठी ग्रामस्थामार्फत विविध समित्या.
लातूर,दि.16 : शिवशक्ती प्रतिष्ठाण हरंगुळ (बु) द्वारा नगरीमध्ये सोमवार, दि.21 जुलै,2025 रोजी गुरुवर्यांच्या शुभहस्ते श्रीगणेशा, श्री विरभद्रेश्वर, श्री भद्रकाली, श्री दत्त नर्मदेश्वर, श्री ललितात्रिपुरसुंदरी, श्री.पंचमुखी हनुमान, श्री.शनिदेव, श्री.नागेश्वर,श्री रेणुकाचार्य, श्री मन्मथस्वामी आणि श्री नंदी यांची विधिवत प्राणप्रतिष्ठापना सोहळा शिवशक्ती धाम, श्री विरभद्रेश्वर मंदिर, लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लीश स्कुलच्या समोर, हरंगुळ बु. येथे आयोजित केला आहे.
सकाळी 8 वाजता पूजा, सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठापना, रुद्रयाग पुजा, सकाळी 11 वाजता धर्मसभा व गुरुवर्यांचे प्रवचन होऊन त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. तत्पूर्वी रविवार 20 रोजी सकाळी 11 वाजता मंडल पूजा व धान्यादिवास पुजेस सुरुवात दुपारी 3 वाजता जलादिवास पुजन, रात्री 9 वाजता शय्यादिवस पूजन होईल.
या सोहळयासाठी विशेष सेवा, कार्यक्रम समिती, सेवा समिती, मिरवणूक समिती , महाप्रसाद समिती विधिवत पूजेसाठी वैदिक मंडळ सज्ज झाले आहे.
या सोहळयास खासदार डॉ. शिवाजी काळगे, उमरग्याचे आमदार प्रविण स्वामी, अजित पाटील कव्हेकर, अर्चनाताई पाटील चाकूरकर, नगरसेवक शैलेश स्वामी, हरंगुळ नगरीचे सरपंच शितलताई भिमाशंकर झुंजारे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमामध्ये सर्व भाविक-भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन वेदशा.प्रा.रमेश रामलिंग स्वामी व गावकऱ्यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी वेदशा.प्रा.रमेश रामलिंग स्वामी भ्रमणध्वनी क्रमांक 9767397877 यांच्याशी संपर्क साधावा.