सांखळी येथे वजन कमी करणे आणि मधुमेही मुक्तीवर : डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान
सांखळी (प्रतिनिधी) : आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणारे वजन आणि मधुमेह यावर नियंत्रण ठेवणे हे आजच्या काळातील मोठे आव्हान बनले आहे. या पार्श्वभूमीवर रविंद्र भवन आणि गोवा कॉलेज ऑफ नेचुरोपथी अँड योगिक सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वजन कमी करणे आणि मधुमेही मुक्ती’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे व्याख्यान रविवार, २७ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता रविंद्र भवन, सांखळी येथे पार पडणार आहे. व्याख्यानासाठी प्रसिद्ध आरोग्यतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित (MD, PGDHA, PGDHRM, FISCD, FIAPSM, FIPHA) उपस्थित राहणार असून, मधुमेह निर्मूलनावरील त्यांच्या संकल्पना व कार्यामुळे ते देशभरात प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी पंतप्रधान कार्यालयातील कर्मचारी वर्ग आणि SPG कमांडो यांनाही वजन कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
व्याख्यानात मधुमेह निर्मूलन आणि जागतिक विक्रमाची कहाणी, निरोगी जीवनशैली, व्यायाम व दिनचर्येचे फायदे, मधुमेह व औषधांपासून मुक्तीसाठी प्रभावी उपाय, डाएटिंग आणि त्यावरील योग्य नियंत्रण ठेवणे. या व्याख्यानाचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.