संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश

लातूर: संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल, लातूर येथील विद्यार्थ्यांनी NEET UG, IIT-JEE, MHT-CET, CBSE अशा राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांमध्ये यंदा अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या यशामागे संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोविंदराव पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

शाळेतील एकूण १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी २०२४ साली घेण्यात आलेल्या NEET UG, JEE-ADVANCE, MAINS, MHT-CET, MTS अशा विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. यामध्ये NEET UG परीक्षेत २१५ विद्यार्थ्यांपैकी २१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यातील १०० विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा अधिक गुण मिळवले. याशिवाय JEE MAINS परीक्षेत ७५ विद्यार्थी पात्र ठरले असून, १२ विद्यार्थ्यांना JEE ADVANCE मध्ये पात्रता मिळाली आहे.

MHT-CET PCM गटात ३७ विद्यार्थ्यांनी आणि PCB गटात १५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले. यावर्षी अनेक विद्यार्थ्यांनी विविध मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोविंदराव पाटील, सचिव संदीप पाटील, संचालक मंडळ व मुख्याध्यापक एम. ए. मेंग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी श्री. गोविंद वळसे पाटील उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून, भविष्यातही अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रयत्नशील राहण्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.


Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर