निवृत्ती वेतनधारकांनी आधारकार्ड व पॅनकार्ड**संलग्न करण्याचे आवाहन

       लातूर, दि. 28 (जिमाका):   जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक व कुंटूंब निवृत्तीवेतनधारक यांनी भारत सरकारच्या आयकर विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या परिपत्रक क्रमांक 09/2025 नुसार आपले आधारकार्ड सोबत पॅनकार्ड दि. 30 सप्टेंबर, 2025 पूर्वी संलग्न (लिंक) करावे.
विहीत मुदतीत आधारकार्ड व पॅनकार्ड संलग्न न केल्यास ऑक्टोबर 2025 च्या निवृत्तीवेतनातून व कुंटूंब निवृत्तीवेतनातून आयकर कायद्यान्वये जास्तीचा आयकर कपात करण्यात येईल, असे जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्वला पाटील व अप्पर कोषागार अधिकारी के.एन. खोजे यांनी कळविले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर