वैशाली बुद्ध विहारात २७ जुलै रोजी धम्मदेशनेचे आयोजन
लातूर, दि. २५: वैशाली सार्वजनिक बुद्ध विहार, बौद्धनगर येथे रविवार, दिनांक २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता धम्मदेशनेचे आयोजन करण्यात आले आहे. प. भं. डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध धम्म वर्षावास पुणीत चर्वण निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
या प्रसंगी पूज्य भिक्खु सुमेधजी नागसेन (बुद्धलेणी, खरोसा) हे धम्मदेशना करणार असून सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन हे आयु. निलबाई श्रीराम कांबळे, आयु. रामभाऊ दामु कोरेडे केले आहे.