आ. अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त
उत्सव नव्हे, उत्तरदायित्व!
मुंबई : मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक जाणिवेला मान देत, आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा करण्याचा जो आदर्श घालून दिला आहे – फलक, जाहिरातबाजी, मोठमोठे सोहळे नकोत; गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करा! – तो खरोखरच अनुकरणीय आहे.
हेच विचार मनात ठेवत, ही मदत केवळ एक औपचारिकता नाही, तर सामाजिक बांधिलकीची प्रामाणिक जाणीव आहे.
या माध्यमातून मी सर्व नागरिक, कार्यकर्ते आणि जनप्रतिनिधींना आवाहन करतो
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शक्य तितकी मदत करा, हीच खरी मानवसेवा आहे.
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाला सादर प्रणाम.