'क्या हुआ, तेरा वादा?',शिवसेनेने विचारला आमदार कराड यांना प्रश्न!
लातूर, दि. ६ : विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपा महायुतीने शेतकऱ्यांना दिलेल्या सर्व आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.६) लातूर ग्रामीणचे आमदार रमेशअप्पा कराड यांची भेट घेत 'क्या हुआ, तेरा वादा?', असा सवाल केला. निवडणुकीत दिलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनासह इतर सर्व आश्वासने पूर्ण करावी, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने राज्यातील जनतेला अनेक आश्वासन दिली. विशेषतः शेतकऱ्यांना कर्जमाफी, एक रुपयांत पीक विमा आणि वीज बिल माफी असे प्रमुख आश्वासन होते. महायुती सरकार आज रोजी येऊन वर्ष झाले. तरीही हे आश्वासन पूर्ण न केल्याने शेतकरी आत्महत्या सारखा गंभीर पर्याय निवडत आहे. यामुळे राज्य शासनाला जाब विचारण्यासाठी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने क्या हुआ तेरा वादा? हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती आमदार रमेश कराड यांना दिली.
या शिष्टमंडळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, सहसंपर्कप्रमुख नामदेव चाळक, महिला जिल्हा संघटक सौ. जयश्रीताई उटगे, सौ. सुनिताताई चाळक, उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव, महानगरप्रमुख सुनिल बसपुरे, शहरप्रमुख विष्णुपंत साठे, महानगर संघटक माधव कलमुकले, रिक्षा सेनेचे त्र्यंबक स्वामी, लातूर तालुकाप्रमुख कैलास पाटील, प्रकाश अंधारे, अल्पसंख्यांक सेनेचे मुनीरखान पठाण, विधी आघाडीचे युवराज इंगोले, किसन समुद्रे, हनुमंत पडवळ, फारुख नाना शेख, हेमलता पवार, वनमाला अवताडे, संध्याताई आरदवाड, बालिका पुंड, सचिन नळेगावकर, सूर्यवंशी सर, प्रदीप उपासे, राहुल रोडे, ऋषिकेश पाटील, गणेश गंगणे, विकार देशमुख, करण शिंदे, प्रसाद, रवी समुखराव, राम चोथवे, अनिकेत मोरे, नरसिंग काकडे, पप्पू जाधव, शिवाजी कांबळे यांचा सहभाग होता.