डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त भुजंग कांबळे यांचा पूर्व भाग कृती समितीने केला सत्कार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भषण पुरस्कार प्राप्त भुजंग कांबळे यांचा पूर्व भग कृती समितीने केला सत्कार.
लातूर, दि. १३(प्रतिनिधी) : लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते, बौध्दाचार्य, पत्रकार बी.एम.कांबळे तथा उत्तम कांबळे यांना महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर केल्याने आज शुक्रवार दिनांक 13 जून 2025 रोजी लातूर शहर पूर्वभाग नागरी हक्क कृती समितीने पत्रकार भवन येथे फेटा बांधून शाल व रोपे देऊन सत्कार केला.
यावेळी प्रस्ताविकातील भाषणात समितीचे अध्यक्ष दीपक गंगणे यांनी बोलताना सामाजिक कार्य सामाजिक कार्यकर्ते, बौध्दाचार्य, पत्रकार बी.एम.कांबळे तथा उत्तम कांबळे यांना महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार असून ते दिवंगत एम.बी.कांबळे भारतीय बौध्द महासभा विभागीय सचिव यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी दुर्बल पिडीत, अन्यायग्रस्त घटकातील जनतेला न्याय देण्यासाठी संघर्ष केला असून अस्वच्छ सफाई कामगार, मेहत्तर भंगी, रूकी वाल्मिकी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लातूर शहर पूर्व भागातील श्री भुजंग माधवराव कांबळे यांचे योगदान मोलाचे आहे. पत्रकार म्हणून गेल्या 40 वर्षापासून जनसेवेत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन योग्य सन्मान केल्याचे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काकासाहेब घुटे तर प्रमुख पाहुणे म्हणून अंगद वाघमारे
प्रा. नागनाथ डोंगरे
नितीन चालक, खंडेराव देडे, डॉ. बालाजी रणक्षेत्रे, मच्छिंद्र नागिमे, भगवेश्वर धनगर यांची प्रमुख उपस्थिती होती.