फ्रंटियर सिक्युरिटी फोर्सचे प्रविण सोनवणे यांचा रुग्णांना मदतीचा हात
*गरीब रुग्णाच्या नातेवाईकाला अंत्यविधीसाठी व प्रवासासाठी दिली आर्थिक मदत*
लातूर, दि.8 : जून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात गेली नऊ महिन्यापासून नऊ क्रमांकाच्या अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णालयातून घराकडे जाण्यासाठी रुग्णवाहिका व अंतविधी करण्यासाठी लागणारा खर्च सोबत एक सुरक्षा रक्षक देऊन फ्रंटियर सेक्युरिटी फोर्सचे प्रविण सोनवणे यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात एक वयस्कर आजी दररोज कोणाकडून तरी पैसे मागून आणायच्या आणि रोजचा दिवस भागवायच्या ही परिस्थिती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी अनुभवत असताना परिस्थितीची जाणीव असणारे आणि नेहमीच सामाजिक जाणीवा जपणारे देशसेवा संपवून सेवानिवृत्त असलेले माजी सैनिक तथा फ्रंटियर सेक्युरिटी फॉर्सेस प्रविण सोनवणे यांनी या आजीला त्यांचा रुग्ण मयत पावल्यावर रुग्णालयातून घरी जाण्यासाठी रुग्णवाहिका व अंत्यविधीसाठी लागणाऱ्या खर्चासोबत एक सुरक्षारक्षक सोबत देऊन मयत रुग्णाच्या मूळ गावी दिनांक 6 जून रोजी दुपारी रवाना केले असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली आहे.
परिस्थितीचे प्रसिद्धीसाठी भांडवल व्हायला नको म्हणून सदर बातमीतील रुग्णाचे नाव व गावचे नाव स्पष्ट करण्यात आले नाही. सोनवणे यांनी दाखवलेली ही तत्परता आणि सामाजिक जाण कौतुकास्पद असून त्यांनी भविष्यात अश्या रुग्णांना लागेल ती मदत करण्याचे आश्वासन पञकारांशी बोलताना दिले आहे.