विद्यार्थांना मोफत तायक्वांदो प्रशिक्षण शिबीर : मनपा उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांच्या हस्ते उद्घाटन

मनपा उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसोळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन.

लातूर दि 05 जून राजमाता जिजाऊ महानगर-पालिका शाळा क्रमांक 11 येथे लातूर महानगर-पालिका व तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर यांच्या वतीने दहा दिवसीय मोफत तायक्वांदो स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबिरास सुरुवात करण्यात आली असून या शिबिराचे उद्घाटन मनपा उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे व मनपा शिक्षण विभाग प्रमुख सौ नागमे यांच्या हस्ते पार पडले तर कार्यक्रमासाठी मनपा शाळा क्रमांक 11 चे मुख्याध्यापक वैभव बोंदर आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक मास्टर नेताजी जाधव, मास्टर के वाय पटवेकर, मास्टर धनश्री मदने, मास्टर जानवी मदने यांची उपस्थिती होती.

महानगरपालिकेच्या हद्दीतील शाळेमध्ये विविध क्रियाशील व विद्यार्थ्यांच्या हिताचे उपक्रम राबवून महानगरपालिकेचे विद्यार्थी सरस बनवण्याच्या हेतूने या उपक्रमाचे आयोजन उपायुक्त डॉक्टर खानसुळे यांनी केले आहे. दहा दिवस चालणारे हे तायक्वांदो स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांना सामान्य जीवन जगत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोबत दोन हात करण्याची क्षमता निर्माण केली जाणार असून दहा दिवस खेळाडूंना सकस आहाराबरोबर मार्शल आर्ट प्रशिक्षण दिले जाणार असून महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना सक्षम केले जाणार असल्याचे मत उपायुक्त डॉ खानसुळे यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले आहे. हे प्रशिक्षण दिनांक पाच जून ते पंधरा जून दरम्यान सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत पार पडणार आहे.

या शिबिरास साठ विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनपा शिक्षक देवराज लंगोटे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनपा शिक्षक श्री मांडे व सौ गुजे यांनी नियोजन केले होते. यावेळी पत्रकार बांधवही उपस्थित होते.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर