श्री. चंद्रकांत वाघमारे यांना महाराष्ट्र शासनाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार जाहीर, मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
लातूर, दि. ९ : लातूर येथील संत गोरोबा सोसायटी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रकांत वाघमारे यांना महाराष्ट्र शासनाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला असून मंगळवार, दि. १० जुलै २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण मुंबई येथे राज्याचे मा.ना. श्री. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा.उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर, सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाठ, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, लोकसभा सदस्य अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा होणार आहे. हा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याची पावती आहे.
त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याचे कळताच त्यांचे अभिनंदन लातूरचे नंदादीप वार्ताचे न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक खंडेराव देडे, संपादक आकाश देडे, अँड.अंगद गायकवाड, जी. ए. गायकवाड, भानुदास कुडके, नारायण कांबळे, माजी नगरसेवक कैलास कांबळे, उदय गवारे, अमोल देडे, श्रावण मस्के, माजी आमदार राम गुंडिले साहेब, दयानंद कांबळे, संजय सूर्यवंशी, मच्छिंद्र कलवले, नागनाथ कांबळे, राजकुमार जाधव, किशोर वाघमारे, नारायण पुरी आदींनी अभिनंदन केले आहे.
यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.
श्री. चंद्रकांत वाघमारे यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शासनाने हा पुरस्कार जाहीर केला आहे. गेल्या ४० वर्षांपासून त्यांनी मातंग समाज व विविध घटकातील समाजातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी केलेले आहे. समाजासाठी वेळोवेळी केलेल्या कामाची पावतीच आहे.
या पुरस्कारात स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहार व प्रमाणपत्र, सहपत्नीक गौरव केला जातो, यात रोख रक्कम २५ हजार रुपये, एसटी महामंडळाचा पास देण्यात येतो.
यामुळे त्यांचे संबंध मित्र परिवारातून हार्दिक अभिनंदन होत आहे.