*बालकिशनजी मुंदडा (गुरुजी) यांना "महेश भूषण" पुरस्कार – समाजभरातून अभिनंदन* गुरूवार, दि. ५ जून २०२५ रोजी वितरण

लातूर, दि. ४ लातूर जिल्हा माहेश्वरी सभा दरवर्षी समाजहितासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना *"महेश भूषण"* या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करते. यावर्षी हा सन्मान *श्री. बालकिशनजी पांडुरंगजी मुंदडा (गुरुजी)* यांना प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार *हैदराबाद येथील ख्यातनाम उद्योगपती सौ. भगवती महेश बलदवा* यांच्या शुभहस्ते, तसेच समाजातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, *गुरुवार, दिनांक ५ जून २०२५ रोजी दुपारी ४ वाजता,* दयानंद सभागृह, लातूर येथे आयोजित भव्य समारंभात प्रदान केला जाणार आहे.
गुरुजींनी गेल्या कित्येक वर्षांपासून उद्योग, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात निस्वार्थपणे केलेल्या कार्यामुळे समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजप्रेम, उदारता आणि निःस्वार्थ सेवा यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्याचमुळे लातूर जिल्हा माहेश्वरी सभा पुरस्कार समितीने त्यांची निवड "महेश भूषण" या सन्मानासाठी केली.   
समाजातील सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियावर, समाजमाध्यमांमधून तसेच वैयक्तिकरित्या देखील अनेकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. त्यांच्या या गौरवामुळे संपूर्ण लातूर जिल्हा माहेश्वरी समाजात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमासाठी सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर