लक्ष्मीकांत सोमाणी यांना महेश गौरव पुरस्कार २०२५ प्रदान


              लातूर, दि. ६ :- येथील नामांकित व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्री. लक्ष्मीकांत मोतीलालजी सोमाणी यांना गुरुवार दि. ०५ जून २०२५ रोजी दयानंद सभागृह लातूर येथे लातूर जिल्हा माहेश्वरी सभा यांचेकडून यावर्षीचा महेश गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. जेष्ठ समाजसेविका तथा उद्योजिका सौ. भगवतीदेवी महेश बलदवा यांच्या हस्ते महेश गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष सी. ए. प्रकाश कासट व ईतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. श्री लक्ष्मीकांतजी सोमाणी यांनी शून्यातून विश्व निर्माण करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी मागील काळात आर्थिक, धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत सदरील पुरस्कार देण्यात आला आहे.

     श्री लक्ष्मीकांतजी सोमाणी यांनी कर सल्लागार म्हणून काम करत असताना अनेकांना न्याय देण्याचे काम केले आहे. टॅक्स प्रोफेशन असोसिएशन लातूरचे अध्यक्ष पद व टॅक्स फेडरेशन ऑफ महाराष्ट्र चे जनरल सेक्रेटरी म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. तसेच मागील जवळपास ३ दशकापासून लक्ष्मी पतसंस्था, श्रीकिशन सोमाणी विद्यालय व लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक या नामांकित संस्थेच्या विकासात त्यांचे योगदान राहिले आहे. २०२४ मध्ये अर्बन को-ऑप. बँकेच्या राष्ट्रीय स्तरावरील समेट मध्ये त्यांना बेस्ट स्पीकर या अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे. सध्या लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कार्य अविरतपणे सुरू आहे. या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर शुभेछाचा वर्षाव होत आहे. सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर