बेशिस्त दुचाकी वाहन चालवणाऱ्यांना लगाम; वाहतूकीस शिस्त लावण्याची मागणी

       लातूर, दि. २० : लातूर शहराची वाढती लोकसंख्या शिक्षणाकरिता बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची लक्षणीय संख्या यात श्रीमंतांच्या मुलांना / विद्यार्थ्यांच्या वाजनापेक्षा जास्त न पेलवणारे अवजड दुचाकी गरज नसताना शोक  म्हणून वापरतात तेही वेग मर्यादा ओलांडून वाहन चालवत असताना दिसत आहेत. यात अतिउत्साही युवक/ विद्यार्थी रस्तावर दुचाकी नागमोडी इतरांच्या पुढेजण्याच्या नादात इतर वाहनांना कट मारीत, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वेगवान पद्धतीने शहरात सर्वत्र फिरत असल्याने रोज छोटे मोठे जीवघेणे अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे याची तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन विना परवाना अवजड ,  आधुनिक तंत्रज्ञानाच्या जलदगतीने पळणाऱ्या दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणांवर  प्रतिबंद घालून शहरातील बेशिस्त वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्य प्रबोधन करून वाहतुकीचे नियम शिस्तबद्ध वाहतुकी करिता शिबिराच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शनाचे आयोजन करण्याच्या मागणीचे निवेदन आज लातूर शहर  पूर्व भाग नागरी कृती समितीच्या वतीने शहर वाहतूक  पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्या कडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे निवेदनावर लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समितीचे अध्यक्ष दीपक गंगणे , डॉ बालाजी रणक्षेत्रे,खंडेराव देडे, बाबासाहेब बनसोडे,भगवेश्वर धनगर,इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर