सत्याला सत्य म्हणुन जाणने म्हणजे धम्म : प्रा सुधीर अनवाले.
सत्याला सत्य म्हणुन जाणने म्हणजे धम्म ! प्रा सुधीर अनवाले.
लातुरः रविवार दि११/०५/२०२५
धम्माच पालन करायचं म्हणजे नेमकं काय? तर सत्याला *सत्य* म्हणुन जाणने तर अस्त्याला असत्य म्हणुन जाणने म्हणजे धम्म होय,असे प्रतिपादन प्रा. सुधीर अनवलेयांनी केले.ते वैशाली बुद्धविहार बौद्धनगर लातूरयेथे २५६९व्या बुद्ध जयंती निमित्त रविवारच्या बुद्ध वंदने प्रसंगी बोलत होते.
प्रारंभी भ. बुद्ध व डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प व पुष्पमाला अर्पण करुन बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरवात झाली.
पुढे बोलताना प्रा. अनवले म्हणाले,पुर्वी समाज जिवनाच्या केंद्रस्थानी *निसर्ग* होता.पुन्हा ईश्वर आला.भक्ती आली. भक्तीमुळे ईश्वराला प्रसन्नकरुन घेता येते हा भाव आला.नंतर समाजजिवनाच्या केंद्रस्थानी समाज आला. पैसा आला.बुद्धाने सांगितले *मनुष्य* सत्य , ब्रम्हमिथ्या.हे बुद्धाने सांगितले . भ. बुद्धानी समाजजिवनाच्या केंद्र स्थानी *माणुस* सांगितला,म्हणुन हि प्रूथवी माणसामुळे सम्रुध्द झाली.आज असत्य हे सत्याचे रुप घेवुन येत आहे,म्हणुन धम्मचळवळीची गरज आहे,आसे सोदाहरण सांगितले
या वेळी पाहुण्यांचा सत्कार सुर्यभान लातूरकर, दामु कोरडे,वसआत वाघमारे,गौतम चिकाटे भिमाई ग्रुपचे अध्यक्ष शाहुराज कांबळेसह सर्व पदाधिकारी, लता चिकटे,आशा बानाटे,शारदा सातपुते,शारदा वाघमारे ,शोभा सातपुते यांनी केला या प्रसंगी भिमाई कॕलेंडर काढल्याबद्दल जेटीथोर यांचा तर पत्रकार अमोल इंगळे यांचा शाल ,पुष्पहार स्म्रुती चिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. बौद्धाचार्य केशव कांबळे यांनी सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन केल्याने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.