*लातूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती उत्साहात साजरी!*
लातूर (प्रतिनिधी)
एक कर्तृत्ववान, दानशूर आणि लोककल्याणासाठी समर्पित अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त लातूरमध्ये अभिवादनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती व जिल्हा प्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.
या वेळी उपस्थित होते –अँड. मचंकराव डोणे अँड. एम. जी. मांडूरके बाळकृष्ण धायगुडे डॉ. सुरेश वाघमारे डॉ. गोडबोले डी. एस. नरसिंगे सह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य आजही राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहे. त्यांच्या न्यायनिष्ठा, प्रशासनिक कौशल्य आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे स्मरण करत लातूरकरांनी या महान विभूतीस कृतज्ञतापूर्वक वंदन केले.