*लातूर जिल्ह्यातील 51 नीट परीक्षा उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश*▪️4 मे रोजी होणार परिक्षाला
लातूर, दि. 2 : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत नीट-2025 ही परीक्षा 04 मे 2025 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत एका सत्रामध्ये लातूर जिल्ह्यातील विविध 51 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी येणार आहेत. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी 4 मे 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी व्यतीरिक्त पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रितरित्या प्रवेश नाही. परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे, कृत्य करता येणार नाही. 100 मीटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपींग सेंटर, एसटीडी बूथ, ध्वनीक्षेप इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई आहे. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना परीक्षासंबंधी कर्तव्य पार पाडण्याच्या अनुषंगाने हे आदेश लागू राहणार नाहीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
*लातूर जिल्ह्यातील खालील केंद्रांवर घेतली जाणार परीक्षा-*
1.राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर ब्लॉक - ए, चंद्रनगर, मुख्य बसस्थानकाजवळ, लातूर
2.शारदा ज्युनियर कॉलेज, लातूर ब्लॉक - ए, अंबाजोगाई रोड, लातूर
3.पोस्टे पोदार लर्न स्कूल, उदगीर, पोस्टे कॅम्पस, नालेगाव रोड, मलकापूर, ता. उदगीर, जि. लातूर (महाराष्ट्र)
4.यशवंत विद्यालय, नांदेड रोड, लातूर
5.शारदा ज्युनियर कॉलेज, लातूर ब्लॉक - बी, अंबाजोगाई रोड, लातूर
६.दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर ब्लॉक - ए, बार्शी रोड, लातूर
७.दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर ब्लॉक - बी, बार्शी रोड, लातूर
८.दयानंद विधी महाविद्यालय, बार्शी रोड, उषाकिरण पेट्रोल पंपाजवळ, लातूर
९.एमडीए रॉयल इंटरनॅशनल स्कूल, कोळपा, एमडीए शैक्षणिक कॅम्पस, लातूर-नांदेड एनएच-361, कोळपा पोस्ट कासारखेडा, ता. व जि. लातूर, महाराष्ट्र
१०.दयानंद विज्ञान ज्युनियर कॉलेज ब्लॉक - ए, बार्शी रोड, लातूर
११.जयक्रांती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लातूर, सिताराम नगर, अष्टविनायक मंदिरामागे, लातूर
१२.दयानंद कला महाविद्यालय, लातूर ब्लॉक - ए, बार्शी रोड, लातूर
१३.सरस्वती विद्यालय, खाडगाव, प्रकाश नगर, लातूर
१४.केशवराज विद्यालय, श्याम नगर, अंबाजोगाई रोड, लातूर
१५.परीमल ज्युनियर कॉलेज, नारायण नगर, विवेकानंद पुरम, लातूर
१६.राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर ब्लॉक - बी, चंद्रनगर, मुख्य बसस्थानकाजवळ, लातूर
१७.श्री श्री रविशंकर इंग्लिश प्रायमरी स्कूल, लातूर ब्लॉक - ए, गोपाल नगर, उत्तराधी मठाजवळ, औसा बार्शी रिंग रोड, लातूर
१८.जिजामाता कन्या प्रशाला, लातूर, विवेकानंद चौक, पोलिस क्वार्टरजवळ, नांदेड रोड, लातूर
१९.माउंट लिटेरा झी स्कूल, लातूर, पीव्हीआर चौकाजवळ, खाडगाव रिंग रोड, लातूर
२०.संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल, ए-34, विस्तारित एमआयडीसी, हरंगुळ रेल्वे स्टेशनजवळ, बार्शी रोड, लातूर
२१.विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय, अलमला, ता. औसा, जि. लातूर
२२.ख्रिस्त इंटरनॅशनल स्कूल, सर्व्हे क्र. 41(पी), तळेगाव गाव, लातूर-नांदेड महामार्ग, ता. अहमदपूर, जि. लातूर
२३.दयानंद विज्ञान ज्युनियर कॉलेज ब्लॉक - बी, बार्शी रोड, लातूर
२४.दयानंद कला महाविद्यालय, लातूर ब्लॉक - बी, बार्शी रोड, लातूर
२५.श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, सिग्नल कॅम्प, लातूर
२६.एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय, बार्शी रोड, लातूर, महाराष्ट्र
२७.पोदार इंटरनॅशनल स्कूल, दिलीप माने नगर, खडगाव रिंग रोड, लातूर
२८.श्री राजनारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, सिग्नल कॅम्प, लातूर
२९.श्री देशिकेंद्र विद्यालय, महात्मा बसवेश्वर प्राथमिक विद्या मंदिराजवळ, खेळाच्या मैदानाची इमारत, शिव नगर, लातूर
३०.महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, खंडोबा गल्ली, लातूर
३१.डॉ. चंद्रभान सोनवणे ज्युनियर कॉलेज, सिताराम नगर, अष्टविनायक मंदिरामागे, लातूर
३२.बसवण्णप्पा वाले न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, संभाजी नगर, खाडगाव रोड, लातूर
३३.प्रयागबाई पाटील ज्युनियर कॉलेज, मयूरबन कॉलनी, अंबाजोगाई रोड, लातूर
३४.स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूल, पी-74, एमआयडीसी, पीव्हीआर थिएटरजवळ, कळंब रोड, लातूर
३५.युनिक इंटरनॅशनल स्कूल, जटाल हेरिटेज, बाभळगाव रोड, लातूर
३६.श्री श्री रविशंकर इंग्लिश प्रायमरी स्कूल, लातूर ब्लॉक - बी, गोपाल नगर, उत्तराधी मठाजवळ, औसा बार्शी रिंग रोड, लातूर
३७.श्री मारवाडी राजस्थान विद्यालय, लातूर, सिग्नल कॅम्प, जुने रेल्वे स्टेशनजवळ, लातूर
३८.किडीज इन्फो पार्क, पेठ, ता. व जि. लातूर
३९.विद्याविकास माध्यमिक विद्यालय, श्रीनगर, लातूर
४०.पुरणमल लाहोटी शासकीय पॉलिटेक्निक, औसा रोड, नंदी स्टॉप, लातूर
४१.मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चंद्रोदय कॉलनी, प्रकाश नगर, लातूर
४२.शासकीय निवासी महिला पॉलिटेक्निक, बार्शी रोड, लातूर
४३.एमआयटी-वर्ल्ड पीस स्कूल, गट क्र. 35, आर्वी रोड, लातूर सेंट्रल जेलजवळ, नांदगाव, लातूर
४४.जिजामाता विद्यालय, पी-78, एमआयडीसी, लातूर
४५.श्री लाल बहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बांधकाम भवनाजवळ, जुना औसा रोड, लातूर
४६.शिवाजी महाविद्यालय, शिवतीर्थ परिसर, मुख्य रस्ता, रेणापूर, जि. लातूर
४७.महात्मा गांधी इंग्लिश स्कूल (सीबीएसई), सर्व्हे क्र. 119 ए, उजनी, ता. औसा, जि. लातूर
४८.श्री शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल, एमआयएमएसआर मेडिकल कॉलेजसमोर, अंबाजोगाई रोड, लातूर
४९.ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल, सरस्वती नगर, ग्रँड हॉटेलमागे, बार्शी रोड, लातूर
५०.रिनेसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल, मचिले मळा, डी मार्टजवळ, लातूर-नांदेड बायपास रोड, लातूर
५१.विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (पॉलिटेक्निक), मांजरा साखर कारखान्याजवळ, नवीन एमआयडीसी, बार्शी रोड, लातूर.