लातूर मनपाचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची प्रकृती स्थिर
लातूर:- दि. ६, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री बाबासाहेब मनोहरे यांनी काल रात्री उशिरा डोक्यात गोळी झाडून घेतल्याचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. यासंदर्भातील माहिती मिळताच तातडीने जिल्हाधिकारी डॉ. वर्षा ठाकूर घुगे , तसेच पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेतली, सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. हनुमंत किनिकर यांच्याशी संपर्क करून श्री मनोहरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केले, श्री मनोहरे यांच्यावर सुरू असलेल्या उपचाराची माहिती देऊन त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
श्री बाबासाहेब मनोहरे यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी त्यांना आराम मिळावा ही सदिच्छा!