औसा खरेदी-विक्री संघाच्या नूतन संचालकांनी घेतली सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची भेट


औसा :-औसा तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली गेली दहा वर्ष खरेदी-विक्री संघाने तालुक्यातील शेतकऱ्यांना हमीभाव तसेच हमीभाव मिळत नसेल तर फरकाची रक्कम मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न केले आहे सदरील नूतन संचालक मंडळांनी सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांची भेट घेतली. 
शेतकऱ्याच्या हितासाठी सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्यासाठी संचालक मंडळाने कटिबद्ध राहावे अशी अपेक्षा सहकार मंत्री दिलीपरावजी देशमुख यांनी व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
यावेळी संघाचे सभापती संतोष सोमवंशी, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, उपसभापती शेखर चव्हाण, सुरेश भुरे, शिवाजी हांडे, महादेव पाटील, गणेश जाधव, मारुती मगर, नंदकुमार साळुंके , बालाजी धुमाळ, नवनाथ लवटे, श्रीधर साळुंके , किशोर जाधव, केशव डांगे, राजेंद्र साळुंके , योगेश पाटील, श्रीकांत गोरे, बालाजी जन्मले आदीची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर