पीकविम्याच्या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेचा रास्ता रोको


औसा : दि.15, शेतकऱ्यांना पीकविमा द्यावा, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्यावा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मंगळवारी लोदगा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी व युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन झाले.  
 गेली तीन वर्षे झाली, शेतकऱ्यांना पीकविमा मिळत नाही. आता काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे. बहुतांशी 90 टक्के शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.बैलगाडी, बैलासह एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले 
या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विलास लंगर, उपतालुकाप्रमुख चंद्रकांत तळेगावे, सर्कल प्रमुख श्रीहरी काळे, स्वरुप डिग्रसे, ज्ञानेश्वर उजळंबे, हनमंत करळे, सुनील खंडागळे, विवेक जाधव, अजीत काळे, नेताजी भोईबार, नवनाथ लांडगे, सचिन उजळंबे, मुकेश पारवे, स्वरूप काळे राम मुकदम, धम्मपाल गायकवाड यांच्यासह शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर