“भारतीय संविधान” राष्ट्रीय चारित्र्य निर्मणाचे प्रभावी माध्यम डॉ. श्रीराम भालेराव *नंदादीप वार्ता न्यूज*

“भारतीय संविधान” राष्ट्रीय चारित्र्य निर्मणाचे प्रभावी माध्यम
 डॉ. श्रीराम भालेराव
लातूर दि २६ मार्च 
भारतीय संविधान हे राष्ट्राचे चारित्र्य निर्माणाचे प्रभावी माध्यम असून संविधानाच्या मजबूत पायावर भारताची लोकशाही टिकून आहे असे प्रतिपादन  डॉ. श्रीराम भालेराव यांनी केले. 
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, लातूर आणि आम्ही सेवक, हैप्पी व्हिलेज, हासेगाव ता.औसा जि.लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने हॅप्पी व्हिलेज, हासेगाव येथे “युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी विशेष युवक वार्षिक शिबिरातील बौद्धिक सत्रात ते बोलत होते. 
यावेळी विचारपीठावर अध्यक्षस्थानी डॉ. मनोहर चपळे हे होते तर विचारमंचावर प्रा. किसनाथ कुडके आणि माजी मुख्याध्यापक बाबुराव सावंत यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. भालेराव म्हणाले की, भारतीय राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार निर्भीड व स्वाभिमानाचे जगणे भारतीय नागरिकांना प्रदान करते. स्वातंत्र्य, समता, न्याय , बंधुता या मूल्यांचा उद्घोष करणारी आहे. भारतीय संविधान भारतीय नागरिकांच्या जीवनाचा आधार आहे. भारत हा लोकशाही व्यवस्था राबवणारा जगातील सर्वात मोठा देश आहे, त्यामुळे संविधानाचा संविधानाचा सन्मान सर्वांनी करावा असेही ते म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात  डॉ. मनोहर चपळे म्हणाले की, भारतीयांनी संविधानिक अधिकाराबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवून भविष्याची वाटचाल करायला हवी. संविधानिक मूल्ये प्रत्यक्ष व्यवहारात येण्याची नितांत गरज असल्याचेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किसनाथ कुडके यांनी केले. सूत्रसंचालन ऋतुजा भिसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिवाली मुकडे यांनी मानले.
या कार्यक्रमाला रासेयो स्वयंसेवक-स्वयंसेविका आणि हॅपी व्हिलेज येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर