*मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा* *जास्तीत जास्त युवक - युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन*


 लातूर :  राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून नोकरी मिळण्याची त्यांची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. यासाठी बारावी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार, आयटीआय, पदविका 8 हजार आणि पदवीधर, पदव्युत्तर प्रशिक्षणार्थ्यांना 10 हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त  युवक - युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त बालाजी मरे यांनी केले आहे. 
  लघु आणि मध्यम व मोठे उद्योग यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी https://www.cmykpy.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदविलेली आहे. या कार्य प्रशिक्षण योजनेतर्गत प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विभागामार्फत विद्यावेतन दिले जाईल. प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात (डिबीटी) ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल.
प्रमुख आस्थापना, उद्योजकांनी अधिसूचित केलेली रिक्तपदे लातूर अर्बन को- ऑप बँक, लातूर (32 जागा), ट्वेटी वन शुगर लिमिटेड, मळवटी रोड, लातूर (50 जागा), इंडोमोबिल सेल्स & सर्विसेस (महिंद्रा शोरूम) लातूर, (32 जागा), महाराष्ट्र नागरी सहकरी बँक लातूर (12 जागा), एम.एस.बिडवे इंजिनिअरिंग महाविद्यालय लातूर (16 जागा) शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी ता.औसा, जि.लातूर (13 जागा) बालाघाट पॉलटेक्नीक रुद्धा, ता. अहमदपूर, जि.लातूर (03 जागा) . 
  या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://www.cmykpy.mahaswayam.gov.in/या वेबपोर्टलला भेट देवून योजनेमध्ये सहभागी व्हावे. या वेबपोर्टलवर पूर्वी उमेदवार नोंदणी केलेली असेल, तर उमेदवारांसाठी (उमेदवारांनी आपला रजिस्ट्रेशन क्रमांक व पासर्वड ने लॉगीन करून आपली प्रोफाईल अपडेट करावी. व इतर तपशीलमध्ये आपली माहिती (उदा. बँकेचे नाव, आयएफएससी कोड, खाते क्रमांक, शाखा कोड, व आपले रहिवासी प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, व कॅन्सल चेक अपलोड करावे.),   तसेच आपला युजर आयडी व पासवर्डने लॉगीन करून रिक्तपदे निहाय अप्लाय करावे. या योजनेचा जास्तीत-जास्त उमेदवारांनी, लाभ घ्यावा,  असे आवाहन  करण्यात येत आले आहे. 
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर या कार्यालयाच्या 02382- 299462 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनजिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बा.सु.मरे यांनी केले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर