महात्मा बसेश्वर महाविद्यालयात क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना विनम्र अभिवादन

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना विनम्र अभिवादन
लातूर दि. २३ मार्च 
महाराष्ट्र शासन, महाविद्यालय जयंती उत्सव समिती आणि गणित विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद दिन प्राचार्य कक्षात संपन्न झाला. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. संजय गवई हे होते.  तसेच माजी प्राचार्य डॉ. एम. एस. दडगे, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे आणि डॉ.  मनोहर चपळे यांची उपस्थिती होती.  
सर्वप्रथम क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेला सर्वांच्या उपस्थितीत पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 
यावेळी यावेळी बोलताना माजी प्राचार्य डॉ. एम. एस. दडगे म्हणाले की, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भगतसिंग यांना फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्यांच्या मातोश्रीला आपला मुलगा देशासाठी बलिदान देत आहे याचा सार्थ अभिमान वाटला होता आणि भगतसिंग सारखे आणखी पुत्र मला असते तर त्यांनाही मी देशाबद्दल स्वाभिमानच शिकविला असता असे उद्गार त्यांनी सर्वांना सांगितले.  
या कार्यक्रमाचा अध्यक्षिय समारोप करताना प्राचार्य प्रोफेसर डॉ. संजय गवई म्हणाले की, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपल्या आयुष्यामध्ये देशाच्या स्वातंत्र्य प्रती त्यागाची भावना जोपासली आहे. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे आज शहीद दिनानिमित्त त्यांच्या या गौरवशाली बलिदानाची आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कृतीशील आचरणातून आठवण केली पाहिजे असे ते म्हणाले. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रत्नाकर बेडगे यांनी केले तर आभार डॉ. मनोहर चपळे यांनी मानले. 
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदू काजापुरे, बालाजी डावकरे आणि योगिराज माकणे    यांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर