*खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँकेस सदिच्छा भेट.... बँकेचे केले कौतुक.

लातूर : सोमवार दि.०३ मार्च २०२५ रोजी लातूरचे लोकप्रिय खासदार मा.डॉ.शिवाजी काळगे यांनी लक्ष्मी अर्बन को-ऑप.
बँकेच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल,व्हा चेअरमन सतिश भोसले,  व्यवस्थापन मंडळाचे चेअरमन तथ संचालक लक्ष्मीकांत सोमाणी, संचालक सूर्यप्रकाश धूत, अजितलाल आळंदकर, शशिकांत मोरलावार, गणेश हेड्डा, विशाल हलवाई, तज्ञ संचालक किशोर भराडिया, राजेश अग्रवाल, तसेच सभासद फुलचंद देशमुख, प्रल्हाद दुडिले, चंद्रकांत सूर्यवंशी (पाटील), सुरेश ढमाले, तसेच कैलास कांबळे, बँकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश आळंदकर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 बँकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश आळंदकर यांनी बँकेची माहिती दिली, प्रास्ताविक बँकेचे व्यवस्थापन मंडळाचे चेअरमन तथा संचालक  लक्ष्मीकांत सोमाणी यांनी केले यावेळी त्यांनी नागरी सहकारी बँका बाबत कर कायदातील आवश्यक बदल, भारतीय रिझर्व बँकेचे धोरण व सहकार कायद्यातील  तरतुदी याबाबतच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली व केंद्र सरकारने याबाबतीत विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल यांनी बँकेच्या आर्थिक व समाजिक प्रगतीचा आलेख यावेळी मांडला.
 खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी नागरी सहकारी बँकांच्या विविध प्रश्नांवर उत्तर देताना सांगितले की, पुढील काळात संसदेत व शासन दरबारी नागरी सहकारी बँकांची विविध प्रश्न मांडणार असून नागरी सहकारी बँका अधिक समक्ष करण्याची गरज असल्याचे मत मांडले. लक्ष्मी अर्बन बँकेची वाटचाल अतिशय कौतुकास्पद असल्याचे सांगत बँकेचे संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले. 

बँकेचे अधिकारी सुशिल जोशी यांनी सूत्रसंचालन करताना लक्ष्मी अर्बन बँक हि आधुनिक व डिजिटल बँक असल्याचे सांगितले, तसेच सामाजिक भावनेतून काम करणारे संचालक मंडळ व विनम्रपणे काम करणारे कर्मचारी हि बँकेची ताकद असल्याचे सांगितले. आभार बँकेचे व्हा. चेअरमन सतिश भोसले मानले.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर