*लातूर येथे विवाहपूर्व संवाद केंद्राचे ८ मार्च रोजी होणार उद्घाटन*



*विवाहानंतरचे कौटुंबिक वाद टाळण्यासाठी उपक्रम*

लातूर  : राष्ट्रीय महिला आयोगाच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा परिषद येथे विवाहपूर्व संवाद केंद्र सुरु करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनी अर्थात ८ मार्च २०२५ रोजी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या उपस्थितीत या केंद्राचे उद्घाटन होईल.

विवाहानंतरचे कौटुंबिक वाद टाळण्यासाठी विवाहापूर्वीच वधू-वर आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये संवाद घडवून आणणे, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये विवाहपूर्व संवाद केंद्र स्थापन होणार आहेत. लातूर जिल्ह्यातही ८ मार्च रोजी विवाहपूर्व संवाद केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख यांनी दिली.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर