लोक शाहिर अण्णाभाऊ साठे जयंतीचे अध्यक्ष पदाच्या बैठकीमध्ये शसस्त्र हल्ला व धिंगाणा घालणारा मुख्य फरार आरोपी विकास कांबळे याला हायकोर्टाची चपराक अटक पूर्व जामिन फेटाळला


लातूर  : दिनांक ३०/०६/२०२४ रोजी लोक शाहिर अण्णाभाऊ साठे सार्वजनीक जयंतीचा अध्यक्ष ठरविण्यासाठी गंजगोलाई चौक लातूर येथे बैठक बोलविण्यात आली होती त्या ठिकाणी सर्वानुमते राज क्षिरसागर यांचे नाव अध्यक्ष म्हणुन घोषित करण्यात आले सदर बैठकी दरम्यान विकास कांबळे, पवन कांबळे, संतोष पाटोळे, विशाल कांबळे, बालाजी चौरे, बळी गायकवाड, जिवन कांबळे, अतिष पाटोळे, राजेंद्र लोंढे व अजय कांबळे सर्व राहणार लातूर तसेच बालाजी मस्के राहणार बाभळगांव व इतर ८ ते १० लोकांनी अध्यक्ष निवड मान्य नसल्याचे व आणखीन एक अध्यक्ष करण्याची घोषणा देत पत्रकार परिषद चालु असतांना सर्वानी मिळुन शसस्त्र हल्ला चढविला.

सदर लोकांनी चाकु व बेल्टच्या सहाय्याने सर्वांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्यामध्ये आकाश लोंढे व सुरज लोंढे, विकास लोंढे तसेच नारायण जोगदंड यांना गंभीर दुखापत झाली व राज क्षिरसागर हे बालबाल बचावले. सदर घटनेवरून सुरज लोंढे यांनी गांधी चौक पोलिस स्टेशन लातूर येथे दिनांक ३०/०६/२०२४ रोजी प्रथम खबर क्रमांक ४२९/२०२४ हि भा.दं. वि. कलम ३०७ व इतर कलमाअंतर्गत दाखल केली. सदर गुन्हयातील मुख्य आरोपी विकास कांबळे हा घटनेच्या तारखेपासुन फरार होता तसेच सदर प्रकरणात दोष आरोपपत्र हे दिनांक २७/०९/२०२४ ला दाखल झाले व फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २९९ प्रमाणे आरोपी विकास व इतर यांना फरार घोषित केले होते.
तदनंतर मा. जिल्हा सत्र न्यायालय लातूर येथे आरोपी विकास याने अटक पुर्व जामीन दाखल केला होता व तो अर्ज मा. न्यायालयाने गुणदोषावर फेटाळला सदर निर्णयाविरुध्द आरोपीने मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अटक पुर्व जामीन दाखल केला.
सदर जामिन अर्जामध्ये मुळ फिर्यादी यांनी अॅडव्होकेट नरेंद्र बापुसाहेब पाटेकर यांच्या वतीने हस्तक्षेप अर्ज दाखल केला. सदर प्रकरणामध्ये दिनांक २६/०३/२०२५ रोजी सुनावणी होऊन आरोपी व सरकारी पक्ष तसेच मुळ फिर्यादी यांच्या विधितज्ञांचा युक्तीवाद झाला आरोपीच्या विधिज्ञांनी युक्तीवादामध्ये असे म्हणणे सादर केले की, आरोपी हा प्रतिष्ठीत राजकीय व्यक्ती आहे म्हणुन राजकीय द्वेषापोटी हेतुपरस्पर पणे त्याला खोटया गुन्हयांत गुंतवले आहे व सदर घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिप मध्ये तो कोठेही हत्याराने मारहाण करत असल्याचे सिध्द होत नाही या मुददयावरती फिर्यादी यांच्या विधितज्ञांनी यांनी प्रती युक्तीवादात मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले की, आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार आहे व सदर घटना ही पूर्व नियोजीत कट कारस्थान करून राज क्षिरसागर यांना जिवे मारण्याच्या उददेशाने केली होती सदरील व्हिडीओ क्लिप ही मॉर्फ केली असुन प्रत्यक्षात साक्षीदार आकाश याला चाकुने मारतानाचा व्हिडीओ डिलीट केला
आहे तसेच मेडीकल सर्टिफिकेट मध्ये आकाश यांना गंभीर दुखापत झाली असुन त्याप्रमाणे प्रत्यक्ष साक्षीदार व फिर्यादी यांनी दिलेला जबाब हा कायदेशीररित्या ग्राहय धरायला हवा तसेच आरोपी हा प्रत्यक्ष स्थळी हजर होता किंवा नव्हता हे केस ट्रायलमध्ये सिध्द होईल म्हणून सध्या अटक पुर्व जामीनाच्या वेळेस हा डिफेन्स चा मुददा कायदयाने ग्राहय धरणे चुकीचे ठरेल तसेच सदर जामीन अर्ज प्रलंबित असतांना फिर्यादी यांना आरोपी विकास याच्च्या भावाने (जिवन सतिष कांबळे) दिनांक २१/०३/२०२५ रोजी धमकी दिली की, "तु सदरील केस मागे घे नाहीतर विकास भाऊ व बालाजी चौरे यांना जामीन झाल्यानंतर तुला जिवंत सोडणार नाही" व त्या अनुषंगाने फिर्यादी यांनी एन.सी.आर. नं. ३४७/२०२५ दिनांक २२/०३/२०२५ रोजी विवेकानंद पोलिस चौकी लातूर येथे दाखल केली आहे. मा. उच्च न्यायालयाने सरकार पक्ष व फिर्यादी यांचे म्हणणे ग्राहय धरुन आरोपी याचा अटक पुर्व जामीन गुणदोषावर फेटाळून लावला. अशी माहिती फिर्यादी यांच्या वतीने देण्यात आली. सदर प्रकरणामध्ये मुळ फिर्यादी यांच्या वतीने अॅडव्होकेट नरेंद्र बापुसाहेब पाटेकर यांनी काम पाहीले तसेच त्यांना अॅडव्होकेट संतोष हरिराम माने व अॅडव्होकेट सुनंदा प्रभाकर भडके यांनी सहकार्य केले.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर