महात्मा बसवेश्वरमध्ये मोडीलिपी प्रारंभिक प्रशिक्षण वर्ग प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात संपन्न


लातूर, दि. २२: श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर (पदवी व पदव्युत्तर इतिहास विभाग) आणि वसुंधरा भाषा, मोडीलिपी संवर्धन आणि संशोधन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ ते २२ मार्च २०२५ या कालावधीमध्ये महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये मोडीलिपी प्रारंभिक प्रशिक्षण वर्ग प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. संजय गवई हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसुंधरा भाषा, मोडीलिपी संवर्धन आणि संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा प्रशिक्षक महेश जोशी, लातूर जिल्हा इतिहास संकलन समितीचे सदस्य शहाजी पवार, मुख्य समन्वयक डॉ. भास्कररेड्डी नल्ला, संयोजक तथा इतिहास विभाग प्रमुख डॉ. सदाशिव दंदे आणि प्रा. भीमाशंकर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी शेख बुशरा, गायकवाड मोहिनी, गायकवाड धिरज, इतिहास मंडळाचे सचिव शुभम दांडेगावे, मुस्ताफ सय्यद, प्रणाली पुरी या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 
यावेळी बोलताना प्रमुख मार्गदर्शक महेश जोशी म्हणाले की, मोडीलिपी ही भाषा नसून त्याची भाषा ही मराठी आहे. आज इतिहासामधील अनेक माहिती मोडीलिपी मध्ये उपलब्ध आहे. तेव्हा ही मोडीलिपी आपण सर्वानी समजून घेऊन आपला ऐतिहासिक ठेवा जतन करावा यासाठी आपण सर्वांनी सक्रिय सहभागी झाले पाहिजे. मोडीलिपीचा प्रारंभ यादव काळात झाला असून इंग्रजीमध्ये ज्याप्रमाणे कर्सिव्ह रायटिंग आहे त्याचप्रमाणे मराठी मधील कर्सिव्ह रायटिंग म्हणजेच मोडीलिपी होय, असे त्यांनी सांगितले. 
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्रोफेसर डॉ. संजय गवई म्हणाले की, आपण सर्वांनी मोडीलिपी ही वृद्धिंगत केली पाहिजे त्यासाठी समाजातील आवड असणाऱ्या व्यक्तींनी मोडीलिपी समजून घेऊन तिचा वापर दैनंदिन व्यवहारांमध्ये केला पाहिजे आणि आपल्या देशामध्ये असलेला ऐतिहासिक ठेवा जतन केला पाहिजे असे ते म्हणाले. 
यावेळी लातूर जिल्हा इतिहास संकलन समितीचे सदस्य शहाजी पवार यांनीही मार्गदर्शन केले. 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सदाशिव दंदे यांनी केले. सूत्रसंचालन साक्षी घोडके हिने तर आभार मोरे साधना हिने मानले. 
या प्रशिक्षणाचा एकूण ३० प्रशिक्षणार्थी यांनी लाभ घेतला त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. 

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर