औसा खरेदी विक्री संघाच्या नूतन संचालकाचा गोंद्री येथे सत्कार


औसा : औसा तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध विजयी झालेल्या सर्व बिनविरोध विजयी झालेल्या सर्व नूतन संचालकाचा तालुक्यातील गोंद्री येथे सत्कार सोहळा पार पडला.
याप्रसंगी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष सूर्यवंशी, युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, शहरप्रमुख सुरेश भुरे, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, बाजार समितीचे माजी उपसभापती किशोर जाधव, माजी तालुकाप्रमुख संजय उजळंबे, विधानसभा संघटक श्रीराम कुलकर्णी, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सलीम पटेल, शिवाजी हांडे, महादेव पाटील, गणेश जाधव, हिप्परसोगा सरपंच मनोज सोमवंशी, श्रीधर सांळुके, नंदकुमार सांळुके, नवनाथ लवटे, केशव डांगे, बालाजी धुमाळ, राजेंद्र साळुंके, शाहूराज जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
 यावेळी श्रीहरी काळे, नारायण भोसले, हंसराज लंगर, महेश लंगर, संदीपान कांबळे, सत्तार ढालाईत, विलास पाटील, विलास लंगर, हजीर ढालाईत, केशव माळी, नरहरी काळे, धनराज कदम, अमर भोसले, मुस्ताक शेख, महताब ढालाईत विठ्ठल कांबळे, उध्दव लंगर, भागवत लंगर, सुभाष लंगर यांनी परिश्रम घेतले.
यावेळी बोलताना औसा तालुका खरेदी विक्री संघाचे संस्थापक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी म्हणाले की, औसा तालुका तसेच जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या हितासाठी सतत प्रयत्न करीत राहू. औसा तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तूर, हरभरा अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. तसेच हमीभावाने शेतीमाल खरेदी करून तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत केली, असे यावेळी सोमवंशी म्हणाले.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर