क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी राजीव कसबे यांची निवड





औसा , दि. ३ मार्च २०२५ रोजी पुणे येथे आयोजित कार्यकारिणी निवडीच्या बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या निवडीची घोषणा करण्यात आली.यावेळी प्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी, गजाभाऊ अहमदाबादकर, आबासाहेब कोरडे पाटील,अॅड शेरवरी तुपकर,शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल, विनायक सपकाळ, राजेंद्र मोरे, अरुण कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

         राजीव कसबे यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून शेतकरी, शेतमजूर, निराधार, दिव्यांगाच्या प्रश्नांवर राज्यभरात विविध प्रकारचे आंदोलन केले यामध्ये बहुतांश आंदोलनाला यश आले.या पंधरा वर्षांच्या कालावधीत राजीव कसबे यांनी शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे,सत्तार पटेल,अरुणदादा कुलकर्णी,अॅड सचिन ढवण यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक चळवळीत हिरारीने सहभाग नोंदविला आहे.यामध्ये रविकांत तुपकर यांच्या शेतकरी, शेतमजूर व निराधारांच्या विविध समस्यांवर देत असलेल्या लढ्याला बळ देण्याच्या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून राजीव कसबे यांनी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात काम सुरू केले होते.त्याच्या या कामावर विश्वास ठेवून रविकांत तुपकर यांनी कसबे यांच्यावर संघटनेची मोठी जबाबदारी दिली आहे.

                        शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याची ताकद राज्यात केवळ रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात असल्याचा ठाम विश्वास यावेळी राजीव कसबे यांनी बोलताना व्यक्त केला असून यापुढे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यभरात विविध शेतकरी संघटनेची विस्कटलेली घडी पुन्हा क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मुठ बांधून शेतकऱ्यांच्या न्यायासाठी राज्यभर लोकलढा उभा करण्याचा विश्वास कसबे यांनी व्यक्त केला आहे .याप्रसंगी युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे,युवती आघाडी प्रदेशाध्यक्ष अॅड अश्विनी म्हेत्रे, व्यापारी आघाडी सल्लागार सागर मंत्री, विदर्भ प्रमुख किरण ठाकरे, मराठवाडा प्रमुख गजानन कावरखे, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अॅड आदित्य आरेकर, उत्तर महाराष्ट्र प्रमुख ईश्वर पाटील, राज्य समन्वयक म्हणून सचिन पांडूळे यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी संघटनेचे राज्यभरातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर