*जुन्यावाहनांवर 30 एप्रिलपूर्वी एचएसआरपीनंबर प्लेट बसविण्याचे आवाहन*



लातूर दि. ११ :  वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरीकरुन होणारे गुनहे कमी करणे, रस्तयावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीयसुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना एच.एस.आर.पी. बसविणे अत्यावश्यक असून याबाबतसर्वोच्च न्यायालयाने निर्देशही दिले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी व नागरिकांच्यासुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहनांना एच.एस.आर.पी. बसविण्याचे महत्व लक्षात घेवूनमहाराष्ट्र शासनाने 9 एप्रिल, 2019 पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृतवाहनांना एच.एस.आर.पी. बसविण्याचा निर्णय घेतला आहे. 

लातूर जिल्ह्यातील 1 एप्रिल, 2019 पूर्वीउत्पादित झालेलया सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना एच.एस.आर.पी. फिटमेंट सेंटर येथूनएच.एस.आर.पी. नंबर प्लेट बसविण्याची कार्यवाही सुरु आहे. परिवहन विभागाच्याhttps://transport.maharashtra.gov.in/ZoneWise WebsiteRedirect. html या संकेतस्थळाचावापर करून लातूर जिल्हयातील अधिकृत फिटमेंट सेंटरवर एच.एस.आर.पी. नंबर बसविण्यासाठीबुकींगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. एच.एस.आर.पी.  नंबर प्लेट बसविण्याची अंतिम मुदत 30 एप्रिल, 2025रोजी पर्यंत आहे. 

लातूर जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनाआवाहन करण्यात येते की, वाहनधारकांची फसवणूक टाळण्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरीलअधिकृत लिंकचा वापर करुन एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी बुकींग करावी. एच.एस.आर.पी.बसविण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विजयचव्हाण यांनी केले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर