पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले दोन दिवसाच्या लातूर दौऱ्यावर


लातूर : राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे २७ व २८ फेब्रुवारी २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

पालकमंत्री ना. भोसले यांचे सातारा येथून २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता निलंगा येथे आगमन होईल. याठिकाणी ते आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची सांत्वनपर भेट घेतील. सायंकाळी ५.१५ वाजता टेंभूर्णी माळेगाव जंक्शन, अहमदपूर वळण रस्ता रा.म.क्र. ३६१ येथे हसर्णी टेंभूर्णी, हसर्णी सावरगाव थोट, शेलदरा केकत सिंदगी ते जिल्हा सरहद रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. सायंकाळी ५.४५ वाजता अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालय मैदान येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ व दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीनुसार लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व मुक्काम.

पालकमंत्री ना. भोसले यांच्या उपस्थितीत २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे लातूर सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक होईल. सकाळी १०.४५ वाजता लातूर शहरातील बार्शी रोडवरील सारथी इमारतीच्या कामाची पाहणी करतील. सकाळी ११.२० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध शासकीय बैठकांना उपस्थित राहतील. दुपारी १२.१०  वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. दुपारी १ वाजता लातूर येथून साताराकडे प्रयाण करतील.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर