सरकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा आज लातूर दौरा


लातूर  : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे बुधवार, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सहकार मंत्री ना. पाटील यांचे सकाळी १० वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवास येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील. सकाळी ११ वाजता अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथील बापुदेव महाराज मंदीर येथे महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचे दर्शन घेतील. दुपारी १२.३० वाजता चाकूर तालुक्यातील नवकुंड झरी बु. येथील सिध्देश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त महादेवाचे दर्शन घेतील. त्यानंतर शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थान येथे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी राखीव. सायंकाळी ४ वाजता लातूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी ५ वाजता लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे दैनिक दिव्य मराठीच्यावतीने आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२५ या स्पर्धेच्या उदघाटन समारंभास उपस्थित राहतील. सोईनुसार शिरूर ताजबंदकडे प्रयाण करतील व इंद्रायणी निवासस्थान येथे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी राखीव.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर