सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांचा दौरा
*NANDADEEP VARTTA*
लातूर : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे आज गुरुवार, २० फेब्रुवारी २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सहकार मंत्री ना. पाटील हे सकाळी ०८.३० वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थान येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील. सकाळी १० वाजता अहमदपूर तालुक्यातील खानापूरकडे प्रयाण करतील. सकाळी १०.४५ वाजता खानापूर येथील हनुमान मंदिर येथे सौ. शांताबाई व श्री. तुकारामजी धोंडीबा सुनूपे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमीत्त उपस्थित राहतील. सकाळी ११.४५ वाजता खानापूर येथून अहमदपूरकडे प्रयाण करतील. अहमदपूर येथील संस्कृती गार्डन येथे दुपारी १२.१५ वाजता श्री. बाबुराव मुसळे यांच्या मुलाचा व डॉ. नागरगोजे यांच्या मुलीच्या साखरपूडा कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी २ वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवास येथे राखीव. सायंकाळी ५.३० वाजता अहमदपूरकडे प्रयाण करतील. अहमदपूर येथील वर्षा गार्डन येथे ५.४५ वाजता श्री. शिवप्रसाद बाबाराव प्रयाग (बिराजदार) यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास सदिच्छा भेट देतील. सायंकाळी ६.३० वाजता चाकूर तालुक्यातील गांजूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी ७ वाजता गांजूर येथे आयोजित भव्य नागरी सत्कार व जिल्हा परिषद शाळा वार्षिक स्नेहसंमेलनास उपस्थित राहतील. रात्री ८.३० वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवास येथे आगमन व राखीव.