सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा आज लातूर दौरा

*सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा लातूर जिल्हा दौरा*

लातूर, दि. ०९ : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे सोमवार, १० फेब्रुवारी २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सहकार मंत्री ना. पाटील हे १० फेब्रुवारी सकाळी ८.३० वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थान येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील. सकाळी ११.३० वाजता चाकूर तालुक्यातील नायगाव येथील रघुनाथ देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. दुपारी १२ वाजता चाकूर येथील यशवंत मंगल कार्यालय येथे श्री विराट विश्वकर्मा प्रभू जयंती उत्सवास सदिच्छ भेट देतील. सोयीनुसार चाकूर तालुक्यातील बोथी येथील गंगाधरअप्पा अक्कानवरु यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. त्यानंतर शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थानकडे प्रयाण करतील व राखीव. 

ना. पाटील हे सायंकाळी ५ वाजता चाकूर तालुक्यातील कलकोटी येथे अखंड हरिनाम सप्ताह व सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थित राहतील. सोयीनुसार हणमंतवाडी येथील बजरंग नरवटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. रात्री ९ वाजता शिरुर ताजबंद येथून लातूरकडे व रात्री १०.३० वाजता लातूर येथून मुंबईकडे प्रयाण करतील.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर