सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांचा आज लातूर दौरा

*सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा लातूर दौरा कार्यक्रम*

लातूर, दि. ०९ : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे शुक्रवार, १० जानेवारी २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सहकार मंत्री ना. पाटील यांचे १० जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता लातूर येथे आगमन होईल व शिरूर ताजबंदकडे प्रयाण करतील. सकाळी ७ वाजता शिरूर ताजबंद येथील शिवछत्रपती नगर येथील इंद्रायणी निवास येथे आगमन व राखीव. सकाळी ९ वाजता शिरूर ताजबंद येथून लातूरकडे प्रयाण करतील. लातूर येथे सकाळी १० वाजता आयोजित मराठवाडा एज्युकेशन कॉन्क्लेव्हतर्फे आयोजित मराठवाडा शिक्षण परिषदेला उपस्थित राहतील. सकाळी ११ वाजता लातूर येथील औसा रोडवरील थोरमोटे लॉन्स येथे आयोजित मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या ६१ व्या राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाला उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता लातूर येथील उद्योग भवन येथे लातूर अर्बन बँक येथे सदिच्छा भेट देतील. दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत लातूर येथे राखीव. सायंकाळी ५ वाजता लातूर येथून शिरूर ताजबंदकडे प्रयाण करतील. सायंकाळी ६ वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवास येथे आगमन व राखीव.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर