*क्रीडा संकुलातील सुविधांचे बळकटीकरण आणि स्वच्छतेला प्राधान्य द्यावे - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले*▪️धावपट्टीवर उडणारी धूळ रोखणे, स्वच्छतेसाठी लातूर शहर महानगरपालिकेचे सहाय्य ▪️जिल्हा क्रीडा संकुल, विभागीय क्रीडा संकुल समितीची आढावा बैठक

*क्रीडा संकुलातील सुविधांचे बळकटीकरण आणि स्वच्छतेला प्राधान्य द्यावे - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले*

▪️धावपट्टीवर उडणारी धूळ रोखणे, स्वच्छतेसाठी लातूर शहर महानगरपालिकेचे सहाय्य 
▪️जिल्हा क्रीडा संकुल, विभागीय क्रीडा संकुल समितीची आढावा बैठक
▪️ विभागीय क्रीडा संकुलातील पहिल्या टप्प्यातील कामांचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश

लातूर, दि. ३१ : जिल्हा क्रीडा संकुल येथे येणाऱ्या खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सुविधांचे बळकटीकरण करावे. स्वच्छता, धुळीवर नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. याकरिता लातूर शहर महानगरपालिकेने सहाय्य करावे, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे दिल्या.

विभागीय क्रीडा संकुल समिती आणि जिल्हा क्रीडा संकुल समितीची आढावा बैठक पालकमंत्री ना. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, प्रभारी क्रीडा उपसंचालक तथा जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्यासह समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

लतुर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलावर येणाऱ्या खेळाडूं, नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यांना चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या खेळांना लातूरकरांची अधिक पसंती आहे, त्या खेळांसाठी आवश्यक सुविधा क्रीडा संकुलात उपलब्ध करून द्याव्यात. यासोबतच सध्या अस्तित्वात असलेल्या मैदानांचे बळकटीकरण, धावपट्टीची दुरूस्ती, स्वच्छता विषयक सुविधा आदी कामांना प्राधान्य द्यावे. याकरिता तातडीने करावयाच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना पालकमत्र्यांनी दिल्या. तातडीने करावयाच्या उपाययोजनांसाठी लातूर शहर महानगरपालिकेने सहकार्य करून क्रीडा संकुल स्वच्छता, धूळ नियंत्रणासाठी पाण्याची फवारणी करावी, असे त्यांनी सांगितले.

*विभागीय क्रीडा संकुलातील पहिल्या टप्प्यातील कामांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना*

कव्हा येथे होत असलेल्या विभागीय क्रीडा संकुलात सपाटीकरण, रस्ते, धावपट्टी,  यासोबतच इतर मूलभूत सुविधांची निर्मिती पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात येईल. यासाठीचा सविस्तर आराखडा तयार करावा. याठिकाणी भविष्यात केल्या जाणाऱ्या सुविधा निर्मितीचा विचार करूनच पाहिल्या टप्प्यातील कामांचे योग्य नियोजन करावे. याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत घेवून आराखडा तयार करावा, असे पालकमंत्री ना. भोसले म्हणाले.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर