लातूर एसटी महामंडळात शिकाऊ उमेदवारांची भरती

*महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात 13 शिकाऊ उमेदवारांची भरती*

लातूर, दि. 13: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागात सन 2024-2025 मधील भाग 03 सत्रासाठी वेगवेगळ्या व्यवसायासाठी 13 शिकाऊ उमेदवारांची (प्रशिक्षणार्थी) पदे ऑनलाईन पध्दतीने भरली जाणार आहेत. यामध्ये मोटार मेकॅनिक (यांत्रिक मोटारगाडी एमएमव्ही) 06 पदे, मोटारगाडी साठाजोडारी (एमव्हीबीबी) (शिट मेटल) 2 पदे, मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रीकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स 1 पद, अभियांत्रिकी पदवीधर अथवा अभियांत्रिकी पदविका 2 पदे आणि मेकॅनिक रेफ्रिजरेशन ॲन्ड एअर कंडिशनर (प्रतिशन व वातानुकूलिकरण टेक्निशियन) 2 पदे अशी एकूण 13 पदे भरावयाची आहेत.

संबंधित व्यवसायातील दहावी पास, आय.टी.आय (एनसीव्हीटी) किंवा विहित व्यावसायात व्होकेशनल अभ्यासक्रम (एमएसबीएसव्हीईटी) पूर्ण केलेल्या, तसेच मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रीकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स यापदांसाठी केवळ आयटीआय उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी सर्वप्रथम एनएपीएस वेब पोर्टलवरील www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर आणि अभियांत्रिकी पदवीधर, अभियांत्रिकी पदविकासाठी एनएटीएस-2.0 पोर्टलवरील www.nats.education.in या संकेतस्थळावर 10 जानेवारी ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करून एमएसआरटीसी डिव्हिजन लातूर (MSRTC Division Latur) E001172700461 या आस्थापनेसाठी (Establishment) ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लातूर विभागीय कार्यालयात उपलब्ध करून दिलेले छापील अर्ज भरावेत. हे छापील अर्ज लातूर शहरातील जुना रेणापूर नाका येथील राज्य परिवहन लातूर विभागीय कार्यालय आस्थापना शाखा येथे शनिवार व रविवार वगळून 21 जानेवारी ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत मिळतील व लगेच स्विकारले जातील. या अर्जासोबत (जीएसटी 18 टक्के सहित) खुल्या प्रवर्गाकरीता 590 रुपये व मागासवर्गीयांसाठी 295 रुपयेचा धनादेश किंवा आयपीओ (इंडियन पोस्टल ऑर्डर) एमएसआरटीसी फंड अकाऊंट लातूर (MSRTC Fund Account Latur) या नावाने अर्ज घेतेवेळी सोबत असणे आवश्यक आहे.

10 जानेवारी ते 20 जानेवारी 2025 या कालावधीनंतर ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, असे अर्ज रद्द समजले जातील. अशा उमेदवारांना कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज देण्यात येणार नाही. जे उमेदवार 25 जानेवारी 2025 रोजी वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यालयाचे विहित नमुन्यातील अर्ज सादर करणार नाहीत, त्यांचा शिकाऊ उमेदवार भरतीसाठी विचार केला जाणार नाही, असे लातूर राज्य परिवहन विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर