लातूर शहरात पोलिसांचा मोठा धडक छापा!मटका अड्ड्यावर कारवाई; 59 इसमांविरुद्ध गुन्हे दाखल!

लातूर शहरात पोलिसांचा मोठा धडक छापा!
मटका अड्ड्यावर कारवाई; 59 इसमांविरुद्ध गुन्हे दाखल!

   लातूर, दि.27:- “लातूर शहरात पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाकडून अवैध व्यवसायांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिवाजीनगर परिसरातील मटका अड्ड्यावर छापा टाकत 11 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच गुटखा विक्री, अवैध दारू, वाळू उपसा आणि गोवंश वाहतूक अशा विविध प्रकरणांमध्ये एकूण 59 इसमांविरोधात 38 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत तब्बल 51 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अवैध व्यवसायांविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध धंद्यांची माहिती ‘खबर’ हेल्पलाईनवर देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.”