“'खबर' हेल्पलाइन सुरू; नागरिकांनी माहिती द्या – DIG शहाजी उमाप”
“नांदेडमध्ये पोलिसांचा मोठा धडाका! लाखोंचा गुटखा जप्त”
“गुटखा, अंमली पदार्थांवर कारवाई; 12 आरोपी जाळ्यात”
“तलवारी-खंजर जप्त! नांदेड पोलीस अॅक्शन मोडमध्ये”
“11 ते 25 एप्रिल विशेष मोहीम; अवैध व्यवसायांवर कडक कारवाई”
“'खबर' हेल्पलाइन सुरू; नागरिकांनी माहिती द्या – DIG शहाजी उमाप”
नांदेड, दि.12 :- नमस्कार. नंदादीप वार्ता न्यूज मध्ये आपले स्वागत. नांदेड परिक्षेत्रात गुटखा, अंमली पदार्थ आणि घातक शस्त्रांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे!
दि. 11 ते 25 एप्रिल दरम्यान ही विशेष मोहीम राबवली जात असून, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाया सुरू आहेत.
पहिल्याच दिवशी पोलिसांनी 1 लाख 17 हजार रुपयांचा गुटखा जप्त करत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याचबरोबर घातक शस्त्रांविरोधातही मोठा धडाका देत 57 हजार रुपयांच्या तलवारी आणि खंजर जप्त करण्यात आले आहेत.
या कारवाईत 11 गुन्हे दाखल करून एकूण 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर भारतीय न्याय संहिता, अंमली पदार्थांवर NDPS कायदा, तर घातक शस्त्रांवर शस्त्र अधिनियमांतर्गत कठोर कारवाई सुरू आहे.
दरम्यान, नागरिकांसाठी 'खबर' हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून, 91 50 100 100 या क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सअॅपद्वारे अवैध व्यवसायांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेड पोलिसांची ही मोहीम गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी किती प्रभावी ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धन्यवाद.