*पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ३० जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा*
*पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ३० जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा*
*नंदादीप वार्ता*
लातूर, दि. २७ : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, ३० जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा नियोजन समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे. बार्शी रोडवरील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही सभा होणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी दिली आहे.